आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नवनिर्वाचित सदस्य व्यस्त….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २३ जुलै – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत १४ जुलै रोजी संपल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाने पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि मनीष काळजे यांना देखील बाजार समितीच्या अप्रशासकीय मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.
दरम्यान जरी मुख्यमंत्र्यांकडून सदरचे पत्र सुपूर्द करण्यात आले असले तरी बाजार समिती आणि निबंध कार्यालयाकडे यासंबंधी आवश्यकत्या शासकीय कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. सदरच्या कागदपत्रांची पूर्तता आणि ना हरकत प्रमाणपत्र दाखल केल्यानंतरच नवनिर्वाचित अशासकीय प्रशासकीय मंडळातील सदस्यांना आपल्या पदाचा पदभार घेता येणार आहे. यासाठी नव्या अशासकीय प्रशासक मंडळातील सदस्यांना त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख याकार्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
प्रतिज्ञापत्र तसेच विविध आवश्यक कागदपत्रे सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सादर करावयाचे आहेत. याकागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच बाजार समितीचा नव्या अशासकीय प्रशासक मंडळातील सदस्यांचा कार्यभार सुरू होणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य कागदपत्रांच्या गोळा बेरीजमध्ये वेगळे असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशासक आणि प्रशासकीय सदस्यांचा ताळमेळ जुळणार का ?
बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी नवीन प्रशासक तथा पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यासह नवनिर्वाचित अशासकीय प्रशासक मंडळातील सदस्य अमोल शिंदे आणि मनीष काळजे यांनी देखील हीच भूमिका व्यक्त केल्या असल्याने प्रशासक आणि प्रशासकीय मंडळातील सदस्यांचा ताळमेळ जुळेल असा आशावाद असा व्यक्त केला जात आहे.