बाजार समितीच्या अडत व्यापाऱ्यांनंतर हमाल-मापाडी माथाडी कामगारांनी उपसले आंदोलनाचे हत्यार….कामगार समन्वय समितीचे धरणे आंदोलन

हमाल-मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीचे धरणे आंदोलन…अडत व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेताच, हमाल मापडी कामगारांनी उपसले आंदोलनाचे हत्यार…

प्रलंबीत मागण्यांसाठी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर करणार निदर्शने…..

सोलापूर व्हिजन 

सोलापूर, दि. २७ ऑगस्ट – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेताच, आता हमाल मापडी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बाजार समितीत कायर्रत असणाऱ्या सोलापूर जिल्हा हमाल-मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीकडून विविध मागण्यासाठी जिल्हा बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सदरचे आंदोलन बाजार समितीच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोर सकाळी ११.वा करण्यात येणार आहे.

कामगारांच्या प्रमुख मागण्या 

१) भुसार बाजाराकरीता लागू करण्यात आलेला टप्पा दुरुस्ती चा ठराव रद्द झाला पाहिजे.

२) संपूर्ण माथाडी कामगाराच्या हमाली तोलाई चा भरणा माथाडी बोर्डात झाला पाहिजे.

३) माथाडी कामगाराकरीता घरकुल व प्राथमिक उपचार केंद्र झालेच पाहिजे.

४) कांदा विभागामधील माल राखणे बंधनकारक करु नये.

       दरम्यान या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, संचालक शिवानंद पुजारी, उपाध्यक्ष भिमा सिताफळे, अध्यक्ष सिध्दाराम हिप्परगी,  सचिव दत्ता मुरुमकर, संघटक गफ्फार चांदा,  राजशेखर काळगी, किरण मस्के, महेंद्र चंदनशिवे, गुरुशांतय्या पुराणिक, सुनिता रोटे, यशोदा गायकवाड, राजू दणाने, विशाल मस्के, हब्बू जमादार, शिवलिंग शिवपुरे, दत्ता बसवेश्वर, नागनाथ खंडागळे, इरफान पिरजादे, शिवानंद जमादार आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *