बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर हमाल मापाडी कामगारांचे धरणे आंदोलन…
टप्पा दुरुस्ती विषयी न्याय मिळण्याची केली मागणी…
सोलापूर व्हिजन
सोलापूर, दि. २९ ऑगस्ट – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेताच, आता हमाल मापडी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बाजार समितीत कायर्रत असणाऱ्या सोलापूर जिल्हा हमाल-मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीकडून विविध मागण्यासाठी जिल्हा बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सदरचे आंदोलन बाजार समितीच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोर करण्यात येत आहे आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे…
कामगारांच्या प्रमुख मागण्या
१) भुसार बाजाराकरीता लागू करण्यात आलेला टप्पा दुरुस्ती चा ठराव रद्द झाला पाहिजे.
२) संपूर्ण माथाडी कामगाराच्या हमाली तोलाई चा भरणा माथाडी बोर्डात झाला पाहिजे.
३) माथाडी कामगाराकरीता घरकुल व प्राथमिक उपचार केंद्र झालेच पाहिजे.
४) कांदा विभागामधील माल राखणे बंधनकारक करु नये.
टप्पा दुरुस्ती पुन्हा करण्यात यावी…
सोलापूर कृषी बाजार समिती प्रशासनाने टप्पा दुरुस्ती करताना कामगारांना विश्वासात न घेता मनमर्जी कारभाराने टप्पा दुरुस्ती केली आहे. त्या टप्पा दुरुस्तीमध्ये कामगारांना न्याय मिळावा त्या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
– भिमा सिताफळे, उपाध्यक्ष कामगार समन्वय समिती सोलापूर.
दरम्यान या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, संचालक शिवानंद पुजारी, उपाध्यक्ष भिमा सिताफळे, अध्यक्ष सिध्दाराम हिप्परगी, सचिव दत्ता मुरुमकर, विशाल मस्के, शिवलिंग शिवपुरे, सचिन बहिरजे, अण्णा कांबळे, मुग्यप्पा धनोरे, किरण मस्के आदींची उपस्थिती होती.