मार्केट यार्डातील व्यापाराला पावणे तीन कोटीला लावला चुना
कांद्याची रक्कम बुडवणाऱ्या सोलापुरातील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१२ जुलै
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्याची तब्बल २ कोटी ९१ लाख ५७ हजार २४६ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमनाथ दत्तात्रय कदम, (वय-४४ वर्षे, रा-प्लॉट नं ४० नटराज हौसिंग सोसायटी शेळगी) सोलापूर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुलेमान वाहिद तेली (वय-३३ वर्षे) याकुब वाहिद तेली, (वय-३६ वर्षे, रा-६९) बेगमपेठ विजापूरवेस सोलापूर यांच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, (दि २१/०२/२०२२ ते दि ०५/०४/२०२२) या कालावधीत (०८.०० वा ते ११.०० वा) चे दरम्यान कृषी उत्पन्ना बजार समिती सोलापूर मार्केड यार्ड येथे गाळा क्र एल ०१/१४ ई ८० श्री सिध्देश्वर मार्केट यार्ड सोलापूर येथे घडली आहे. फिर्यादीचा कांदा व्यापार करत असून यातील आरोपीत मजकूर यांनी फिर्यादीची फसवणुक करण्याचा इरादा ठेवून फिर्यादीकडून ३२,४९२ रूपये पिशवी कांदा त्यांची एकूण किंमत रूपये २,९१,५७,२४६ रू खरेदी केला. त्यानंतर आजतागायत वेळोवेळी रक्कम मागितली असता रक्कम दिली नसल्याने संशयित आरोपींवर ( दि.१२ ) जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला, असून पुढील तपास पोलिस निरीक्षक लकडे हे करीत आहेत.