बाजार समितीमधील १० अडत्यांचे परवाने रद्द ;
प्रशासक मोहन निंबळकरांच्या कारवाईने गैरव्यवहार करणाऱ्या अडत्यांचे धाबे दणाणले …
बाजारपेठेत बेकायदेशीर अडत्यांसोबत व्यवहार न करण्याचे फलक….

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर –
कांद्याच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक काळात प्रशासक मोहन निंबाळकर यांनी कडक निर्णय घेतला आहे. सोलापूर कृषि उत्पन्न बाजारसमितीमध्ये बेकायदेशीर कांदा हा नियंत्रित शेतीमालाची विक्री करणाऱ्या अडत्यांचे थेट परवाने रद्द करत, बेकायदेशीर अडत्यांसोबत कोणताही व्यवहार करू नये असे जाहीर आवाहन फलक प्रशासनाने कांदा सेलहॉल येथे लावला आहे. यामुळे या फलकाची चर्चा सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये जोरात सुरू झालेली आहे. विशेषतः कांदा उत्पादकांनी या अडत्यांकडे कोणताही शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, अशा सक्त सूचनाचे बोर्ड बाजार समितीने आवारात ठिक-ठिकाणी लावले आहेत. प्रशासक मोहन निंबाळकर यांनी कडक निर्णय घेतल्याने गैरव्यवहार व फसवणूक करणाऱ्या अडत्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान बेकायदेशीर अडत दुकानदार गेल्या दोन ते तीन वर्षापासून परवाना नसताना शेतमालाची विक्री करीत होते. ही बाब प्रशासक मोहन निंबाळकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच बाजार समितीच्या ठिक ठिकाणी परवाना रद्द केलेल्या आडत्यांचे बोर्डच लावले आहे.दरम्यान मागील काही दिवसापूर्वी काही अडत्यांनी कांदा विक्री करूनही शेतकऱ्यांची पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे असे परवाना नसलेल्या अडत्यांना प्रशासक यांची चांगलीच धास्ती लागली आहे.
यांचे रद्द केले परवाने
महादेव आण्णाराव पटणे, श्री विनायक ट्रेडर्स, उमेश दत्तात्र्य गोटे, तुकाराम भारत पाटील, संभाजी विजयकुमार स्वामी, रणविजय ट्रेडर्स, सैपन जिलानी चिकलंडे, महादेव किसन शिंदे, गुरू ट्रेडर्स या आडत्यांकडे कांदा हा शेतमाल शेतकऱ्यांनी आणू नये, असा आदेशच प्रशासक मोहन निंबाळकर यांनी काढला.
फसवणूक व गैरव्यवहार करणाऱ्या अडत्यांचे परवान रद्द.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लावलेल्या जाहीर आवाहनातील आडत्यांसोबत शेतकऱ्यांनी कोणताही शेतमाल विक्रीसाठी आणू नये, जेणेकरून संबधित शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. कारण हे आडते परवाना नसताना व्यापार करीत आहेत.
मोहन निंबाळकर, प्रशासक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती.