बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र जाहीर ग्रामीणमध्ये ७ तर शहरात १ मतदान केंद्र
निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांची माहिती
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२१ एप्रिल
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळसाठी घेण्यात येणारी पंचवार्षिक निवडणूक रविवार दि.२७ रोजी सकाळी ८ पासून ते संध्याकाळी ५ पर्यंत संपन्न होणार आहे. सोलापूर शहर व ग्रामीण भागात सदरचे मतदान केंद्र असणार आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात ६ तर शहरी भागात २ मतदान केंद्रावर बाजार समितीचे मतदान होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या मतदानासाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार किंवा गैर प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्र येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील निश्चित करणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानासाठी खालीलप्रमाणे मतदान केंद्र निश्चित करण्यात येत आहेत.
मतदान केंद्र
१)सिद्धेशवर प्रश्नाला पासपोर्ट कार्यलय शेजारी-
सहकारी संस्था / ग्रामपंचायतोची मतदान केंद्रास जोडलेलो गावे-एकरूख, कुमठे, केगांव, खेड, गुळवंची, दहिटणे, देगांव, बाणेगांव, बाळे, भोगांव, मजरेवाडी, शेळगी, सोरेगांव, सोलापूर, हगलूर, हिप्परगे, होनसळ, राळेरास-मतदार संख्या-३३६, ग्रामपंचायत मतदार संघ-२ मतदार संख्या-७८.
२) तिऱ्हे-
बेलाटी, कवठे, कोंडी, डोणगांव, तिन्हे, तेलगांव, नंदूर, पाकणी, शिवणी, पाथरी, हिरज-२४७ सहकारी संस्था,ग्रामपंचायत -११७,
३) नान्नज-
मार्डी, रानमसले, वडाळा, वांगी, अकोलेकाटी, कळमण, कारंबा, कौठाळी, गावडी दारफळ, नरोटेवाडी, नान्नज, पडसाळी, बीबी दारफळ, साखरेवाडी, भागाईवाडी, सेवालाल नगर.-२७३ सहकारी संस्था,ग्रामपंचायत-१७५.
४) निंबर्गी-
कुसूर, अंत्रोळी, खानापूर, तेलगांव, निबगी, बाळगी, भंडारकवठे, लवंगी, वडापूर, विंचूर, शंकरनगर, सादेपूर, कंदलगांव, कारकल, गुंजेगांव, माळकवठे-स संस्थ-२३१,ग्रामपंचायत-१५१
५) मंद्रुप –
चिंचपूर, हत्तरसँग, होनमुर्गा, अकोले मंद्रुप, ओज मंद्रुप, औराद, कुडल, कुरघोट, टाकळो, नांदणी, बरूर, बसवनगर, बोळकवठे, मंद्रुप, मनगोळी, येळेगांव, वडकबाळ, वांगी, गावडेवाडी-स संस्था-२४८,ग्रामपंचायत- १७५,
६)आहेरवाडी
इंगळगी, कणबस (गं), हत्तूर, हिपळे, होटगी (सा), होटगी स्टेशन, आलेगांव, आहेरवाडी, ओज (आ), तिल्हेहाळ, फलाटेवाडी, बंकलगी, बोरूळ, मद्रे, राजूर, शिरवळ, संजवाड, सिंदखेड, घोडातांडा सह संस्था-२३१,ग्रामपंचायत-१७०.
७) वळसंग
कदेहळ्ळी, दिडूर, हणमगांव, आचेगांव, कुंभारी, तीर्थ, तोगराळी, धोत्री, बेत्नाळ, रामपूर, लिंबी चिंचोळी, वडगांव-शिर्पनहळ्ळी, बळसँग, शिगडांव:
स संस्था;१७४ ग्रामपंचायत-१४६,
८) बोरामणी
कासेगांव, दर्गनहळ्ळी, दोड्डो, उळे, उळेवाडी, गंगेवाडो, तांदुळवाडी, पिंजारवाडी, बक्षीहिप्परगे, बोरामणी, मुळेगांव, मुळेगांव तांडा, मुस्ती, वहजी, वरळेगांव, संगदरी स संस्था-१५५,ग्रामपंचायत-१६४ .
त्याच पद्धतीने व्यापारी मतदारसंघातून १२७६ तर हमाल तोलार मतदारसंघातून १०८४ मतदार मतदान करणार आहेत. श्री सिद्धेश्वर प्रशाला मतदान केंद्र असणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असून, निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार केंद्राची निश्चिती त्यानंतर प्रक्रिया संदर्भात तयारी करण्यात निवडणूक प्राधिकरण कार्यालय कामकाजात व्यस्त असल्याचे दिसत आहे.