बाजार समिती निवडणूक तीन जागेवर परिवर्तन पॅनल तर दोन जागेवर विकास पॅनल विजयी
सोसायटी आणि व्यापारी मतदारसंघाकडे लागले लक्ष
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२८ एप्रिल
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात मतमोजणी सुरू झाली आहे. सुरू असलेल्या मतमोजणीत प्राथमिक टप्प्याततील विजयी उमेदवार पाहता आमदार सुभाष देशमुख यांच्या परिवर्तन पॅनलचे मनीष देशमुख, रामपा चिवडशेट्टी, अतुल गायकवाड हे विजयी झाले आहेत. तर सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलचे सुनील कळके तसेच हमाल तोलार मतदारसंघातून गफार चांदा यांना विजयश्री मिळविण्यात यश आले आहे.
दरम्यान, सर्वसाधारण आणि हमाल तोलार मतदारसंघाचे मतमोजणी संपलेली आहे. तसेच व्यापारी मतदारसंघ आणि सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. या दोन मतदारसंघातून कोणत्या पॅनलला आघाडी मिळेल यावर बाजार समितीच्या सत्तेची सूत्रे असणार आहेत. प्राथमिक माहिती नुसार सोसायटी मतदारसंघातून सत्ताधारी पॅनलचे ( दिलीप माने आणि सुरेश हसापुरे गटाचे ) उमेदवार आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरीही अंतिम टप्प्यातील निकाल महत्त्वाचा असणार आहे.