बिग अपार डे शिक्षकांना करावे लागणार “अपार” कष्ट ! …. विशेष मोहिमेअंतर्गत मिळणार विद्यार्थ्यांना आयडी

आज आणि उद्या बिग अपार डे!

इयत्ता नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी देण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम

जिल्ह्यातील सर्व शाळातील प्रमुखांना बैठकीतून दिल्या सूचना 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.९ डिसेंबर

नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंबाबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडन्ट धरतीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी रजिस्ट्री आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अद्याप पर्यंत जिल्ह्यातील ६५ टक्के विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर उर्वरित ३५ टक्के विद्यार्थ्यांना आपार आयडी उपलब्ध करून देण्यासाठी आज सोमवार (दि.९) आणि उद्या (दि.१०) नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळात “बिग अपार डे” साजरा करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात ही विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

    दरम्यान, या नव्या आयडीमुळे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक उपलब्ध होणार आहे. राज्यात त्याचे काम सुरू आहे. (दि.६) डिसेंबर पर्यंत राज्यातील ६०.७५ टक्के विद्यार्थ्यांना अपार आयडी प्राप्त झाला आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आज सोमवार (दि.९) आणि उद्या (दि.१०) नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन समिती व माध्यमांच्या शाळांत ” मेगा अपार डे” साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शिक्षण परिषदेने राज्यातील सर्व जिल्हा परिषद व महापालिकांना विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

            दरम्यान, या विशेष मोहिमेअंतर्गत सर्व शाळात विशेष मोहीम विस्तृत रूपात राबवण्यात येणार, तालुका जिल्हा व महापालिका स्तरावर मुख्याध्यापकांच्या ऑनलाईन बैठका घेऊन सूचना द्याव्यात, मेगा अपार दिनी गटशिक्षणाधिकार, प्रशासनाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी शाळा भेटी देऊन मुख्याध्यापकांकडून सविस्तर माहिती अहवाल घ्यावा, सर्व शाळा मधील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यासाठी पूर्व नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी, आयडीचे कामकाज सुरू न केलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांना कार्यालयात बोलवून सूचना द्याव्यात, अपार आयडी देण्यासाठी प्रथम प्राधान्याने नियोजन करावे. अशा सूचना आणि निर्देश शाळांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळात दोन दिवस आपार आयडी बनवण्याच्या कामकाजाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अपार आयडीचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना आयडी देण्यासाठी विशेष सूचना शाळांना दिल्या आहेत.

कादर शेख, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग सोलापूर जिल्हापरिषद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *