पोटभर धान्यासाठी ….. मागितली दीड दमडीची लाच ….अडकला अँटीकरप्शनच्या जाळ्यात*

*बार्शी तहसील कार्यालयाचा कर्मचारी अँटीकरप्शन च्या जाळ्यात*

सोलापूर व्हिजन

सोलापूर बार्शी : पिवळ्या रेशन कार्डवर धान्य सुरू करण्यासाठी पंधराशे रुपयाची लाच घेताना बार्शी तहसील कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहार पकडले. श्रीमती वर्षा भगवान काळे, इंन्ट्री ऑपरेटर पुरवठा शाखा तहसील कार्यालय बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर रा. मु.पो. कांदलगांव रोड, सायली हॉटेल शेजारी बार्शी असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांना पिवळ्या रेशनकार्डवर धान्य मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बार्शी तहसिलदार कार्यालय पुरवठा शाखा येथील डाटा एंट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांना भेटून लेखी अर्ज दिनांक १४.०६.२०५२४ रोजी केला होता. सदर वेळी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी अर्ज न स्विकारता तक्रारदार यांना १५०० रुपयेची लाचेची मागणी करुन अर्ज व १५०० देऊन दि. १८.०६.२०२४ रोजी बोलावले होते. दिनांक १८.०६.२०२४ रोजी आता एन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदारांचेकडे पिवळया रेशनकार्यावर धान्य सुरु करण्यासाठी १५०० लाचेची मागणी करुन १५०० रुपये डाटा इंन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांनी स्वतः स्विकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बार्शी शहर पोलीस ठाणे पेथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *