विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी जाणून घेतल्या सोलापुरातील व्यापाऱ्यांच्या अडीचणी ; शासन दरबारी समस्या सोडविण्याची दिली ग्वाही

सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी सोडविणार – अण्णा बनसोडे 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२९ नोव्हेंबर 

सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत पोचवून त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजकांना दिली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी शनिवारी सकाळी ऑफिसर्स क्लब येथे सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना व्यापारी व उद्योजकांनी येणाऱ्या अडचणी मांडल्या. या अडचणी शासनदरबारी मांडून सोडविल्या जातील असे अण्णा बनसोडे यांनी उद्योजकांना आश्वासन दिले.

यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड प्रतीक चंदनशिवे, माजी नगरसेविका नूतन गायकवाड

शोभा गायकवाड, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रा. बोळकोठे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *