राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांना बूस्टर डोस ! 

राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांना बूस्टर डोस ! 

सोलापूर व्हिजन न्युज, 

सोलापूर, दि.२७ नोव्हेंबर 

आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांनी रणशिंग फुंकले. प्रभाग क्रमांक १५ व १६ च्या बैठकीमध्ये बोलताना अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ” अबकी बार ७५ पार ” चा नारा सर्वांनी मिळून यशस्वी करण्यासाठीचा शब्द दिला.

सोलापूर महानगरपालिकेत आपण सत्तेच्या दिशेने वाटचाल करू असा विश्वास व्यक्त करत महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाची ताकद दाखवून देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. अण्णा बनसोडे यांनी सोलापूर शहरातील पदाधिकारी व सामान्य कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटी आणि बैठकांच्या दौऱ्याला मोठया जल्लोषात सुरुवात केली.

यावेळी व्यासपीठावर शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जेष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेविका नूतन गायकवाड,महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख,शहर उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने ,कामगार विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे,कार्याध्यक्ष संजय सांगळे , वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *