सोलापुरात १५१ सेविका, ४१६ मदतनीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल !
महिला व बालविकास विभागाकडून पदभरतीचे दिले आदेश…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.५ फेब्रुवारी
अंगणवाडी भरतीची प्रतीक्षा आता संपणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस यांसारख्या रिक्त पद भरतीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी शंभर दिवसांचे उद्दिष्टे ठेवण्यात आले असून या काळात संपूर्ण भरती प्रक्रिया पार पार पडणे आवश्यक असल्याचे असलेल्या महिलांची प्रतीक्षा लवकरच शासनाने स्पष्ट केले आहे. सोलापुरातील नागरी व ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांच्या १५१ व मदतनीसाची ४१६ पदे रिक्त आहेत.
दरम्यान, महिला व बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या मदतनीस दहावी उत्तीर्ण असतील त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार थेट अंगणवाडी सेविका पदी नियुक्त केले जाणार आहे. त्यानंतर रिक्त पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायतीमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील, पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका, यापूर्वी फक्त संबंधित प्रभागातीलच उमेदवारांना अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून निवडले जात होते. आता मात्र यात बदल करण्यात आला आहे. महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात यासंबंधी निवड केली जाणार असल्याने भरतीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, उमेदवारांचे गुणांकन निवडीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
शासनाद्वारे भरती प्रक्रिया नियुक्त आदेश निघाले आहेत. निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी वगळून भरतीची प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर नसेल. नव्याने भारतीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या संबंधीची सर्व माहिती नागरी व ग्रामीण प्रकल्पांच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात सविस्तर उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.
प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर.
नागरी व ग्रामीण भागात भरण्यात येणारी सेविका व मदतनीस पदे
तालुका सेविका मदतनीस
अक्कलकोट – सेविका २५ , मदतनीस ४९
बार्शी – सेविका २३, मदतनीस २४
वैराग – सेविका १४ , मदतनीस १५
करमाळा – सेविका ७ , मदतनीस २९
माढा – सेविका १४, मदतनीस १०
टेंभुर्णी कुर्डवाडी सेविका ०२ , मदतनीस ०६
माळशिरस – सेविका २, मदतनीस १०५
अकलूज – सेविका ०४, मदतनीस १४
मंगळवेढा – सेविका ०३ , मदतनीस ०६
मोहोळ – सेविका ०३ , मदतनीस १५
उ.सोलापूर – सेविका १४ , मदतनीस ०७
पंढरपूर १ – सेविका १२ , मदतनीस ३४
पंढरपूर २ – सेविका १० , मदतनीस ३४
सांगोला – सेविका ०५ , मदतनीस ०७
द.सोलापूर – सेविका ०९ , मदतनीस ३९
कोळा – सेविका ०४ , मदतनीस ०८
मदतनीसांच्या रिक्त पदांचा सेविकांवर येतो ताण
शहर व नागरी प्रकल्पांमधील अंगणवाडी मदतनीस च्या सर्वाधिक ४१६ जागा रिक्त आहे. भरती प्रक्रीया अनेकदा पुढे गेल्यामुळे सेविकांवर. कामाचा ताण बाढला आहे. बालकांना शाळेत बोलावणे, अंगणवाडीची स्वच्छता, पोषण आहार शिजवणे, लसीकरण, गृह भेटी यासह अनेक काम सेविकांना करावी लागत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात ३९ मदतनीसाची पदं मागील पाच ते सहा वर्षांपासून रिक्त आहेत. हक्क रजा, सुट्टी देखील मिळत नाहीय. काही ठिकाणी पर्यवेक्षकाकडून सातत्याने कारवाईचा धाक दाखविणे, अंगणवाडीच्या वाढलेल्या वेळांमुळे सेविका त्रस्त आहेत