आनंदाच्या शिधावर विरजण यंदाची दिवाळी शिधामुक्त
वर्ल्ड ऑफ वूमेन्स संघटनेच्या वतीने रेशन दुकान समोर आंदोलन…

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे दिवाळीनिमित्त दिला जाणारा आनंदाचा शिधा यंदाच्या वर्षी मिळणार नाही. राज्य शासनाच्या वतीने असा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच जाहीर केलेय. आधीच सोलापुरात पुरा मुळे शेतकरी आणि गावकरी यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे जगाचा पोषणदा आज हतबल झाला आहे. अनेकांनी कष्टाने उभा केलेला संसार पाण्यात वाहून गेले त्या संकटातून सावरण्यात खूप काळ लागणार आहे आणि तश्यात सरकारने आता शिधा न देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ऐन दिवाळीत गोरगरीबांची उपासमार होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर वर्ल्ड ऑफ वूमेन्स या संघटनेच्या वतीने रेशन दुकान समोर आंदोलन करण्यात आले. ही योजना गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ऐन दिवाळी आता ही योजना बंद केली जात असल्याने सामाजिक कार्यकर्ता महिलांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. यावेळी संघटनेच्या संस्थापिका विद्या लोलगे आदीं महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सरकारवर रोष व्यक्त केला.
यावेळी संस्थेच्या सायरा शेख, लता ढेरे, लक्ष्मी माने शोभा गायकवाड मार्था आसादे तेजस्विनी मंनगोळी सुरेखा निकम,शिला माने,अनुसया पाथरुढ,सविता पाटील, संगिता पाटील,मंगल असबे, दिपा निकम आदींची उपस्थिती होती.