मूलभूत सोयी सुविधायुक्त प्रभाग 22 होत आहे शहरातील हायटेक प्रभाग – किसन जाधव….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १० ऑगस्ट – महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 हे सर्व मूलभूत सुविधांयुक्त व्हावे यासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांची कामं करण्यामध्ये जास्तीत जास्त भर दिला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तर आणि महापालिका स्तरावरील सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा प्रामाणिकपणे विकास साधण्याचा प्रयत्न केला. वार्डातील स्वच्छता आरोग्य विषयक प्रश्नाबाबत जागरूक राहून प्रथम प्राधान्याने विकास कामे केली.
रस्त्यावर सांडपाणी साचून ठिकठिकाणी दुर्गंधी वाढवत होते त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. यामध्ये नागरिकांची सुटका केली प्रभागांमध्ये सर्वत्र सिमेंट काँक्रिटीकरण, दिवाबत्ती, पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन आधी गरजवंत सुविधा नागरिकांना पुरवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. प्रभाग क्रमांक 22 हे मूलभूत सुविधांवर शहरातील हायटेक प्रभाव आपण सकारात असल्याचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी सांगितले.
दरम्यान प्रभाग क्रमांक 22 येथे अमृत १ योजने अंतर्गत दोन कोटी रुपये निधी खर्चित ड्रेनेज लाईन काम सध्या सुरू आहे या कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाइन प्रणाली द्वारे करण्यात आले होते. दोन कोटी रुपये खर्च येत ड्रेनेज लाईन काम हे अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे पूर्ण होणार आहे याच कामाचं पाहणी किसन जाधव यांनी केले.
यावेळी अक्षय सचिन जाधव, महापालिकेचे JE कुंभार , इरफान शेख,युवराज जाधव,RD जाधव, विशाल गायकवाड, जब्बार शेख, महिबुब शेख, महमद शेख महादेव राठोड, माणिक कांबळे, आदींची उपस्थिती होती.