अमोल बापु शिंदे आणि अनीकेत पिसे यांच्या पदयात्रेस युवक आणि माहिलांची तुफान गर्दी

अमोल बापु शिंदे आणि अनीकेत पिसे यांच्या पदयात्रेस युवक आणि माहिलांची तुफान गर्दी

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२५ डिसेंबर 

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार संजय कदम, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेना प्रवक्या डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहरप्रमुख सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रं. ७ मधून शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे व युवानेते अनिकेत पिसे यांचे प्रचारार्थ गुरुवार दि. २५/१२/२५ रोजी सकाळी ११.३० वाजता पदयात्रेनं प्रारंभ करण्यात आला थोरला मंगळवेढा तालीम येथे श्री गणेशाच्या पुजानाने पदयात्रेस प्रारंभ झाला.

 

या पदयात्रेत शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, कामगार सेना, विधी सेवा समिती, अंगीकृत सर्व संघटना पदाधिकारी तसेच शिवसैनिक, थोरला मंगळवेढा तालीमचे सर्व सदस्य, संकेत परिवारचे सर्व सदस्य, अमोल बापू शिंदे मित्रपरिवार मोठ्या संखेन उपस्थित होता माहिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती हे पदयात्रा पंजाब तालीम, चौपाड, काळी मस्जिद, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निराळे वस्ती,याभागातून निघाली युवकांचा उदंड प्रतीसाद मीळाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *