असंख्य नागरिकांनी घेतला महासेवा शिबिराचा लाभ
अमोल शिंदे यांच्या हातून अनेक समाजकार्य घडो : देशमुख


सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ डिसेंबर –
नागरिकांना लागणाऱ्या रोजच्या जीवनामध्ये महत्त्वाची कागदपत्रे काढण्याचे राहिलेल्यांसाठी महासेवा शिबिर हे एक उत्तम कार्य माजी नगरसेवक, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे हे यांच्या हातून होत आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या हातून असे अनेक समाजकार्य घडो अशा शब्दात सोलापूर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी कौतुक केले.

शिवसेना शहर जिल्हा कार्यालय येथे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या पुढाकारातून घेण्यात येणाऱ्या महासेवा शिबिराला माजी नगरसेवक किरण देशमुख, विनोद भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिबीर घेण्यात आले. यावेळी मोहसिन शेख, अमित अजनाळकर आदी उपस्थित होते. १८ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना शहर जिल्हा संपर्क कार्यालयात शिबीर सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.