“सकल जैन” समाजाने नोंदवला घटनेचा निषेध
मुंबई विलेपार्ले येथील जैन मंदिर उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहरात जैन समाजाचा आक्रोश मोर्चा…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२४ एप्रिल
विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर बुधवार( दि.१६) एप्रिल रोजी बीएमसी प्रशासनाद्वारे पोलीस बंदोबस्तात पूजाअर्चा अभिषेक चालू असताना सर्व भक्तांना सक्तीने बाहेर काढून जेसीबी मशीन द्वारे उध्वस्त करण्यात आले. याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर सकल जैन समाजाच्या वतीने हा प्रश्न मोर्चा काढण्यात आला. शहरातील बाळीवेस येथील गांधी नाथा रंगजी जैन बोर्डिंग येथून मोर्चा काढण्यात आला मोर्च्यामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील जैन बांधवांनी सहभागी होऊन हातामध्ये फलक घेत विविध घोषणा देत घटनेचा निषेध नोंदवला.
वास्तविक हे श्री १००८ दिगंबर जैन मंदिर २६ वर्षे जुने असून, मंदिरात दररोज हजारो भाविक भक्त दर्शनास व पूजापाठ करण्यात येत असतात. मुळातच हा वाद न्यायप्रविष्ट असताना हे जैन मंदिर अनधिकृतरीत्या उध्वस्त करण्यात आले. या कृत्याचा देशभरात जैन बांधवामध्ये आक्रोश निर्माण झाला असून, गावा गावात मोर्चे,धरणे, निवेदने अशी आंदोलने होत आहेत. यासह या मोर्चाच्या माध्यमातून जैन मुनी, साधू, साध्वी जी हे पायी विहार करीत असताना त्यांच्या वर हल्ले होतात,अनेक वेळा अपघातात मृत्यूमुखी पडतात, त्यांना पोलीस संरक्षण मिळावे,अनेक जैन मंदिरावर आणि तिर्थक्षेत्रावर अतिक्रमण होत आहेत. ते बंद व्हावेत प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सकल जैन समाजातर्फे आक्रोश मोर्च्या नंतर निवेदन देताना केतन शहा,सुनील गांधी, कल्पेश मालू,कैलास कोठारी, सुहास शहा,अभिनंदन विभूते, संतोष बंब,पल्लवी मेहता, पदम राका आदींसह सकल जैन समाज बांधव उपस्थित होते.