अक्कलकोट एम.आय. डी.सी. विकास कामांचा श्रेयवाद आला उफाळून… आ.कोठेंच्या पत्रानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे घेतला आक्रमक पवित्रा 

अक्कलकोट एम.आय. डी.सी. विकास कामांचा श्रेयवाद आला उफाळून

ह्याच पत्रावरून सुरू झाला श्रेयवाद..

आ.कोठेंच्या पत्रानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे घेतला आक्रमक पवित्रा

या विकास कामांचे श्रेय केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांनाच :- मनीष काळजे 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२१ मार्च 

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना एम.आय. डी.सी.मध्ये उद्योग व्यवसायास चालना मिळण्यासाठी निधीची तरतूद होण्याबाबत पाठ पुरावा केला होता. या निधीतील काही रक्कम ही सोलापूर महानगरपालिका व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिली जाणार होती.त्या निधीतून ड्रेनेज च्या कामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मनीष काळजे यांनी सांगितले.

        दरम्यान, सदरचे विकास काम आता अंतिम टप्प्यात सुरू असून लवकरच पूर्ण होऊन त्यानंतर रस्ते , पथदिवे यासाठी ३० कोटींचा मंजूर करण्यात आले होते.त्यामुळे यातील ही २५ टक्के अनुदान हे सोलापूर महानगरपालिका व जिल्हा नियोजन समितीनेच दिला होते.त्यामुळे येथील विकास कामांसाठी मनीष काळजे यांच्या पाठपुराव्या नंतर प्राप्त झाला आणि विकास साधला गेल्याचा दावा काळजे यांनी माध्यमांशी बोलताना केला. याच विकासाच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे . याच विकासाच्या मुद्यावरून सत्ताधारी आमदार श्रेय घेण्याचे काम करत असल्याचा थेट आरोप मनीष काळजे यांनी केला आहे . याच विकास कामांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता.यानंतर अक्कलकोट रोड एम. आय.डी.सी. परिसराचा कायापालट झाला असल्याचे काळजे यांनी सांगितले.

     याचे पूर्ण श्रेय उद्योग मंत्री उदय सामंत,तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जाते.त्यांच्या नेतृत्वात आपण या परिसराचा विकास करू शकलो . अस असताना सध्याचे आमदार देवेंद्र कोठे कसे काय  कामाचे श्रेय घेऊ शकतात ? असा संतप्त सवाल मनीष काळजे यांनी उपस्थित केला आहे. वरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मनीष काळजे यांच्या या आरोपानंतर आमदार देवेंद्र कोठे काय भूमिका घेणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *