अखिल भारत पद्मशाली संघमच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी ; श्रीनिवास संगा यांची निवड
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दी.२५ जानेवारी
अखिल भारतीय पद्मशाली संघमच्या युवाजन विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोलापूरचे भाजपाचे युवा नेते तसेच पद्मशाली समाजातील युवकांचे हृदयसम्राट श्रीनिवास संगा यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड हैदराबाद येथील पद्मशाली भवन येथे अखिल भारतीय पद्मशाली महासभेत करण्यात आली.
दरम्यान, श्रीनिवास संगा यांनी आजवर केलेले युवकांचे संघटन, समाजात विखुरलेल्या युवकांना एकत्रित करत आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, धर्म जागरण, पद्मशाली समाजाविषयी असलेली आस्था आदींचा विचार करून त्यांची ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या यानिवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल संगा यांनी सर्वांचे आभार मानले तसेच त्यांना दिलेली जबाबदारी सार्थपणे पेलत पद्मशाली समाजातील युवकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू. समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची उभारणी व्हावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू.
सोलापुरात पद्मशाली भवनची निर्मिती करण्यासाठी विशेष भर देणार. राज्यासह संपूर्ण देशामध्ये असलेल्या पद्मशाली समाजाची एकत्र बांधणी करून त्याचा उपयोग समाजहितासाठी करण्याचा मानस श्रीनिवास संगा यांनी यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कंदागटला स्वामी, जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम, वानम विश्वनाथ जॉईंट सेक्रेटरी दुष्यंतला वन्नम यांनी संगा यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी खजिनदार कोकुला देवेंद्र, पद्मशाली महिला पदाधिकारी व विविध राज्यातील अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली.