कंत्राटी पद्धती रद्द करण्यासह देश पातळीवरील विविध प्रलंबित मागण्यांसाठी जंतरमंतर येथे पुकारणार एल्गार :- राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक 

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा महामेळावा उत्साहात संपन्न 

कंत्राटी पद्धती रद्द करण्यासह देश पातळीवरील विविध प्रलंबित मागण्यांसाठी जंतरमंतर येथे पुकारणार एल्गार :- राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक

राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक महामेळावा संबोधित करताना…

शासकीय नोकर भरती वाढवण्यासाठी तसेच जाचक अटी शिथिल करण्यासाठी समाज बांधव येणार एकत्रित – प्रदेश उपाध्यक्ष बाली मंडेपू यांचा एल्गार 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१२ जुलै 

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारणी व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी मेळावा नवीन पदाधिकारी सत्कार समारंभ कार्यक्रम ग्रामीण पोलीस मुख्यालय येथील अलंकार सभागृहामध्ये संपन्न झाला. या मेळाव्यास संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी सर्व राज्यांचे प्रदेश उपाध्यक्ष सचिव आणि इतर पदाधिकारी अधिवेशनात सहभागी झालेले होते. सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांच्या हस्ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि वासुदेव चांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

        अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या माध्यमातून विविध ठराव वाचन व मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार देशातील सुरू असलेले कंत्राटी पद्धती रद्द करण्यात यावी. महाराष्ट्रातील लाड पागे समितीच्या धर्तीवर सफाई कामगार नियुक्ती योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात यावी. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची व्याप्ती वाढवावी प्रत्येक राज्यात राज्य आयोग नेमण्यात यावेत. त्याच पद्धतीने सफाई कामगारांसाठी वाल्मिकी आर्थिक विकास वित्तीय महामंडळ स्थापन करावे व त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी. यांसारख्या विविध मागण्यांचे ठराव करून त्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी जंतर-मंतर येथे सफाई कामगारांचा एल्गार पुकारला जाणार आहे.

   प्रलंबित मागण्यांसाठी जंतरमंतर येथे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे. यासाठी विविध राज्यपातळीवर बैठका सुरू आहेत. लाड कमिटी नुसार नोकर भरती करण्यात यावी. कंत्राटी नोकर भरती बंद करावी या मागणीसाठी सफाई कामगार यलगार असल्याचा इशारा यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांनी दिला आहे. त्याच पद्धतीने प्रदेश उपाध्यक्ष बाली मंडेपू यांनी देखील या मेळाव्यात प्रास्ताविक करताना शासकीय नोकर भरती वाढवण्यासाठी तसेच जाचक अटी शिथिल करण्यासाठी समाज बांधव येणार एकत्रित असल्याचे सांगितले.

   यावेळी प्रदेश अध्यक्ष बाली मंडेपु, उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नागनाथ गदवलकर, शहराध्यक्ष अहरोन स्वाके,

भूपती आप्पाराव, राजेश वाल्मिकी, शशिकांत सोलंकी, आदींसह राज्यातील व प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी सोलापूर जिल्हा व शहर समाज पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या विविध मागण्या खालीलप्रमाणे……

१. राज्यात १ लाख सफाई कामगारांची भरती करण्यात यावी.

२. कॉन्ट्रक्ट रेग्युलॉयजेशन एबोलेशन एक्ट १९७० व लाड कमेटी प्रमाणे सफाईच्या कामात ठेकेदारी आणु नये आवश्यक्ता पडल्यास रोजंदारी वर सफाई कामगार भर्ती करून कालांतराने त्यांना सेवा ज्येष्ठते प्रमाणे कायम करावे.

३. सफाई कामगारांना श्रमसाफल्य आवासीय योजने प्रमाणे मालकी हक्काने घरे देण्यात यावे.

४.वाल्मिकी-सुदर्शन-मादिगा-मेघवाल-मुस्लिम महेत्तर व उपजातींची मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याच्या सामाजिक आर्थिक / शैक्षणिक / राजकिय ४. मेहत्तर आहे म्हणुण अ ब क ड प्रमाणे उपवर्गीकरण चा लाभ या समाजास देण्यात यावा.

 ५. नागपुर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तथा राज्यातील निवडणुकीप्रमाणे राष्ट्रीय व देशाच्या प्रत्येक राज्य कार्यकारीणी ची विधीवत घोषणा करण्यात येईल.

६. कामगार विरोधी लेबर कोड बील विरोधात ठराव मंजुर करून आन्दोलनाची दिशा ठरविण्यात येईल.

७.राष्ट्रीय जन सुरक्षा विलच्या विरोधात शासना विरुद लढा उभा करण्यात येईल.

 ८. अरिवल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियन चे देश / राज्य / जिल्हा / शहर / तालुका स्तरीय सदस्यता अभियान पार पाडण्यात यावे. सदस्यता ना देणारी शाखा बरखास्त करून नविन पदाधिकारीसहीत शाखा निर्माण करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *