अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा महामेळावा ; कंत्राटी पद्धती रद्द करण्यासह देश पातळीवरील विविध समस्यांचे करणार चिंतन
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध मागण्यांची करणार सकारात्मक चर्चा :- राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ जुलै
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारणी व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी मेळावा नवीन पदाधिकारी सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी सर्व राज्यांचे प्रदेश उपाध्यक्ष सचिव आणि इतर पदाधिकारी अधिवेशनात सहभागी होऊ नये विविध ठराव वाचन व मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानुसार देशातील सुरू असलेले कंत्राटी पद्धती रद्द करण्यात यावी. महाराष्ट्रातील लाड पागे समितीच्या धर्तीवर सफाई कामगार नियुक्ती योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात यावी. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची व्याप्ती वाढवावी प्रत्येक राज्यात राज्य आयोग नेमण्यात यावेत. त्याच पद्धतीने सफाई कामगारांसाठी वाल्मिकी आर्थिक विकास वित्तीय महामंडळ स्थापन करावे व त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी. यांसारख्या विविध मागण्यांचे ठराव करून त्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात येणार आहे.
दरम्यान, या मेळाव्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील तसेच राज्यातील पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांनी केले आहे. सदरचा मेळावा हा शनिवार, दि. १२/०७/२०२५ रोजी स. ११ ते सायं. ५ पर्यंत स्थळ – ग्रामीण पोलीस मुख्यालय, २ नं. गेट, अलंकार भवन, कालिका मंदिर समोर, सिव्हिल चौक, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष बाली मंडेपु, उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नागनाथ गदवलकर, शहराध्यक्ष अहरोन स्वाके,भूपती आप्पाराव, राजेश वाल्मिकी, शशिकांत सोलंकी, आदींसह राज्यातील व प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी सोलापूर जिल्हा व शहर समाज पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या विविध मागण्या खालीलप्रमाणे……
१. राज्यात १ लाख सफाई कामगारांची भरती करण्यात यावी.
२. कॉन्ट्रक्ट रेग्युलॉयजेशन एबोलेशन एक्ट १९७० व लाड कमेटी प्रमाणे सफाईच्या कामात ठेकेदारी आणु नये आवश्यक्ता पडल्यास रोजंदारी वर सफाई कामगार भर्ती करून कालांतराने त्यांना सेवा ज्येष्ठते प्रमाणे कायम करावे.
३. सफाई कामगारांना श्रमसाफल्य आवासीय योजने प्रमाणे मालकी हक्काने घरे देण्यात यावे.
४.वाल्मिकी-सुदर्शन-मादिगा-मेघवाल-मुस्लिम महेत्तर व उपजातींची मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याच्या सामाजिक आर्थिक / शैक्षणिक / राजकिय ४. मेहत्तर आहे म्हणुण अ ब क ड प्रमाणे उपवर्गीकरण चा लाभ या समाजास देण्यात यावा.
५. नागपुर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तथा राज्यातील निवडणुकीप्रमाणे राष्ट्रीय व देशाच्या प्रत्येक राज्य कार्यकारीणी ची विधीवत घोषणा करण्यात येईल.
६. कामगार विरोधी लेबर कोड बील विरोधात ठराव मंजुर करून आन्दोलनाची दिशा ठरविण्यात येईल.
७.राष्ट्रीय जन सुरक्षा विलच्या विरोधात शासना विरुद लढा उभा करण्यात येईल.
८. अरिवल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियन चे देश / राज्य / जिल्हा / शहर / तालुका स्तरीय सदस्यता अभियान पार पाडण्यात यावे. सदस्यता ना देणारी शाखा बरखास्त करून नविन पदाधिकारीसहीत शाखा निर्माण करावी.
९. देशाच्या सर्व राज्यात महाराष्ट्र च्या धर्तीवर लाड पागे समीती प्रभावे वारस हक्काची नौकरी सफाई कामगार सेवा निवृत / मेडीकल अनफिट / स्वेच्छानिवृती / मयत झाल्या वर १. नोकरी देण्यात यावी.