Ajit Pawar News | अजित दादांना हार घालण्यासाठी क्रेनला लटकत आला समर्थक

Ajit Pawar News

Image Source 

Ajit Pawar News | आपल्या आवडत्या आणि लाडक्या नेत्याचे मन जिंकण्यासाठी लोक काय करू शकतात हे काही सांगता येत नाही. असेच एक उदाहरण समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हार घालण्यासाठी एका कार्यकर्त्याने 50 फूट उंचीवर क्रेनने लटकत येत अजित पवारांना हार घालत शुभेच्छा दिल्या.

Ajit Pawar News बारामतीत अजित पवार यांचे जंगी स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती शहरात जंगी स्वागत करण्यात आले. बारामती शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील मदने यांनी अजित पवार यांचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन करण्याचे ठरवले होते. त्यांनी अजित पवार यांना क्रेनला लटकून पुष्पहार घालण्याची इच्छा व्यक्त केली. सुनील मदने यांच्या या ठरावाला सुरुवातीला सर्वांनी विरोध केला.

मात्र मदने यांच्या हट्टापुढे बारामतीचे माजी नगरसेवक संतोष गालिंदे यांनी गुनवडी चौकात आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सुनील मदने यांना सुमारे 50 ते 60 फूट उंचीवर असलेल्या क्रेनवर दोरीच्या सहाय्याने टांगण्यात आले. सुमारे ४५ मिनिटे सुनील मदने असाच हवेत लटकत राहिला. यानंतर अजित पवार यांची सभा जवळ आल्यावर सुनील यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केले आणि उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले.

Ajit Pawar संतापले

 या अनोख्या पद्धतीने अभिनंदन करताना अजित पवारांनाही धक्का बसला आणि त्यांनी आनंदाने शुभेच्छा स्वीकारल्या. या अनोख्या पद्धतीने अभिनंदन केल्यानंतर सुनील मदने यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले, अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत येणार असताना अनोख्या पद्धतीने अभिनंदन करण्याची इच्छा मनात आली होती. ती पूर्ण झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. भविष्यात अजित दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर यापेक्षा मोठा हार मी त्यांना घालणार आहे.

हेही वाचा

Gadar 2 | ‘गदर 2’ ने KGF 2 को पछाड़ बनाया ये रिकॉर्ड

World Cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी बेन स्टोक्स परतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *