निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घमासान ; शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राम राम अजित पवारांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवेश

नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कुरघोड्या
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.५ नोव्हेंबर
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष विरुद्ध पदाधिकारी असा वाद सुरू झाला होता. दस्तुरखुद्द शरद पवार यांच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या विरोधाचे लोण थेट गोविंद बागेच्या अंगणात जाऊन थडकले होते. सोमवारी शरद पवार यांच्या बारामती येथील “गोविंदबाग ” या निवासस्थानी जाऊन शहराच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट आपले गाऱ्हाणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर मांडले. त्यामध्ये मुंबई येथे शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी बैठकीस स्वतः न जाता आपल्या कार्यकर्त्याला पाठवल्याने विषय चिघळला. याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शेला घालून स्वागत केले.

दरम्यान, याच घटनेवरून आता काही पदधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद उफाळून येत असताना शहराध्यक्षांच्या बाजूने राजीनामा नाट्य सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शहराध्यक्ष देखील अचानक घडलेल्या या घटनेनंतर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कुरघोड्या सुरु असल्याचे दिसून येत आहे.

तत्पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक बोलावली होती. याबैठकीस सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुधीर खराटमल यांनी स्वतः न जाता आपल्या कार्यकर्त्याला पाठवले. दस्तुरखुद शरद पवार यांच्या बैठकीला अध्यक्षांनी दांडी मारल्याने तसेच पूर्वाश्रमीच्या भाजपचे कार्यकर्ते असणाऱ्या महेश गाडेकर यांना आपला जवळचा कार्यकर्ता म्हणून बैठकीला पाठवल्याने राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राग अनावर आला. यामुळे राष्ट्रवादीचे शहरातील राजकारण चांगलेच तापले. यावरून शहर राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष विरुद्ध कार्यकर्ता असा कलगीतुरा पहावयास मिळाला होता.