“हुकूम एक्का बॉस” भाऊंनी अन् भाईंनी केले दिलदार स्वागत…महापालिका प्रचार प्रमुखपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांची नियुक्ती…

महापालिका प्रचार प्रमुखपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांची नियुक्ती…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२६ डिसेंबर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या खांद्यावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या नियोजन आणि प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधीर खरटमल यांच्या निवडीचे पत्र बुधवारी काढले आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा आदींनी त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार करून या निवडीचे स्वागत केले.

यावेळी सुधीर खरटमल यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती निष्ठेने सांभाळून महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे दृष्टीने काम करणार असल्याचे सुधीर खरटमल यांनी स्पष्ट केले. सुधीर खरटमल हे ज्येष्ठ नेते असून त्यांना सोलापुरातील राजकारणाचा ३० ते ४० वर्षाचा अनुभव आहे. विविध राजकीय पक्षाचे त्यांचे चांगले संबंध आहेत. सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीचा त्यांना प्रभागनिहाय अनुभव आहे. सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे असे मत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले.

 

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, युवक अध्यक्ष सुहास कदम, विवेक खरटमल , प्रवीण गाडेकर ,अर्चना दुलंगे, चंद्रकांत शेरखाने, प्रा. बोळकोटे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *