सिद्ध बाबा निशाणदार तर कार्याध्यक्षपदी उमेश कोळेकर यांची निवड…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी सिद्ध बाबा निशाणदार तर कार्याध्यक्षपदी उमेश कोळेकर यांची निवड…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१८ मे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाची शनिवारी शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी नगरसेवक सुरेश पाटील,शैलेश पिसे, गणेश नरोटे, बाळासाहेब वाघमोडे, माजी अध्यक्ष पद्माकर हळ्ळी, गुरू कावडे, मनीषा माने उपस्थित होते.

सिद्ध बाबा निशाणदार

 

उमेश कोळेकर

      दरम्यान, बैठकीच्या सुरुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने या बैठकीत सुरुवात झाली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती असून या जयंती निमित्त वर्षभर लोकोपयोगी व समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सन २०२४- २५ वर्षातील पदाधिकाऱ्यांनी जयंती उत्सवाचा लेखाजोखा सादर केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

         पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महामंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला. सन २०२५ – २६ या वर्षासाठी उत्सवा अध्यक्ष म्हणून सिद्ध बाबा निशाणदार तर कार्याध्यक्षपदी उमेश कोळेकर  यांची एकमताने निवड करण्यात आली. खजिनदारपदी शेखर बंगाळे तर सचिव पदी महेश गाडेकर उपाध्यक्ष दिगंबर खरात गंगाधर गावडे शशीकला कसपट्टे, आदीची निवड करण्यात आली. यावेळी बिपिन पाटील, पृथ्वीराज नरोटे, संस्कार नरोटे, किशोर खरात सोपान खांडेकर यांच्यासह अहिल्या भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *