बळीराजा हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असून जन्मभर आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही- जिल्हाध्यक्ष संतोष पवार
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १ जुलै – हरित क्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर शहर जिल्ह्यातील बळीराजाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहीपूर्ण वातावरणात स्वागत करत सत्कार सन्मान करण्यात आला.
दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या मदतीनं प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी झटणारे, कापूस एकाधिकार योजना, धवल क्रांती, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कृषी दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्रर कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात कृषी दिंडी शेतकरी संवाद हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत तेथे उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा फेटा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शुभेच्छा देताना बळीराजा हा खर्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्या ऋणातून आपण जन्मभर मुक्त होऊ शकत नाही असे भावनिक उद्गार जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी काढले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,आनंद मुस्तारे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कस्पटे, युवक अध्यक्ष सुहास कदम , कार्याध्यक्ष तुषार जक्का, संघटक दत्तात्रय बडगंची,विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरु , कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, आशुतोष नाटकर वाहतूक अध्यक्ष इरफान शेख, बाबू पटेल आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.