सोलापूर विमानसेवाच्या उद्घाटनासाठी प्रशासन सज्ज ;
पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ जून
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विमानतळ येथे सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत स्थळ पाहणी केली आणि विमानतळ प्रशासनाच्या कामाचेही कौतुक केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोमवार, (दि.९) जून रोजी या प्रवासी विमानसेवेला सुरूवात होणार आहे. दरम्यान, (दि.१) ऑगस्टपासून सोलापूर-मुंबई या मार्गावरील विमानसेवा चालू होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी जवळपास १५०० लोक बसतील असा शामीयाना उभारण्यात आला आहे. हे नियोजन पाहून विमानतळ व्यवस्थापनाचेही पालकमंत्री गोरे यांनी कौतुक केले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांच्यासह विमानतळावरील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी..
सोलापूर विमानतळ परिसरात जवळपास दीड हजार नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या शामियानाची तसेच धावपट्टी व विमानतळाची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करून संबंधित यंत्रणाना कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त विजय कबाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, विमानतळ प्राधिकरण चे व्यवस्थापक चंद्रेश वंजारा, सहाय्यक व्यवस्थापक अंजनी कुमारी, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, संदीप कारंजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सायंकाळी विमानतळ पार्किंग एरियात उभारण्यात आलेल्या पेंडॉलची पाहणी केली तसेच व्यासपीठ व अन्य सोयीसुधाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विमानतळ परिसर धावपट्टी या ठिकाणी सकाळी आठ तीस ते दहा या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच प्रशासन व विमानतळ प्राधिकरण तसेच फ्लाय ९१ यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली.