बेडर समाजाची दीडशे वर्षांची परंपरा कायम ; दुर्गम्मादेवीचा आषाढ महोत्सव उत्साहात संपन्न….
दीडशे सुवासिनींनी जलकुंभद्वारे बेडर पूल इथल्या दुर्गम्मादेवीच्या पायावर ओतले पाणी…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २८ जुलै – हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्याला सर्वाधिक महत्त्व आहे. या आषाढांमध्ये देवी देवतांना नैवेद्य अर्पण केला जातो. सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असणाऱ्या बेडर समाजाच्या आषाढ महोत्सवाचे एक वेगळेच महत्व आणि परंपरा कायम आहे. याच आषाढ महोत्सवा निमित्त इतर समाजाबरोबर बेडर सामाजाच्या १५० सुवासिनी डोक्यावर जलकुंभ घेऊन रविवारी मिरवणुक काढण्यात आली.

पारंपरिक वाजंत्री, हलगीच्या तालावर पोतराज नाचवत डोक्यावरील कुंभात घेऊन आणलेले पाणी दुर्गम्मादेवीच्या पायांवर घालून सुवासिनी जयजयकार केला. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून मिरवणूक काढली. यंदाही समाजबांधवांनी बैठकीत यात्रेची तारीख निश्चित करून तिची तयारी केली होती. बेडर समाजाची मुख्य देवी दुर्गम्मा देवी असून पेद्दम्मा आणि मर्गम्मा अशा अन्य पाच देवी आहेत. या देवींना आषाढात नैवेद्य दाखवून रोगराई टळू दे म्हणून मिरवणूक काढून निरोप दिला.

प्रारंभी रविवार, २८ जुलै रोजी सकाळी १५० सुवासिनी डोक्यावर कुंभ घेऊन बेडर पूल येथून नळबझार चौक, जगदंबा चौक, मॉडर्न स्कूल, पाठीमागून सातरस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी पत्रकार संघ, रेल्वे पूल येथून जुना रेवणसिद्धेश्वर येथे जाऊन येथील विहिरीतील पाणी कुंभात भरून सुवासिनी पुन्हा त्याचमार्गे मिरवणूक निघाली. दुपारी १ वाजता देवीच्या पायावर पाणी ओतून जयजयकार करीत नैवेद्य दाखवण्यात आले.
सायंकाळी ४:३० वाजता बेडर पूल येथील मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. बेडर पूल येथून सिद्धार्थ चौकापर्यंत ही मिरवणूक पारंपारिक हलगीच्या तालावर काढण्यात आली. यावेळी सिद्धार्थ चौकात एका मंदिरात टोपलीतील देवी खाली उतरवून तिची पूजा करून नैवेद्य दाखवला गेला. त्यानंतर देवीला मनोभावे निरोप देण्यात आला. या प्रथेला १५१ वर्षांचा इतिहास आहे. आषाढ उत्सवातून आरोग्याचा, स्वच्छतेचा नारा दिला जातो. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
समाज बांधवांच्या सुमारे तीन हजार घरांतून नैवेद्य अर्पण
आषाढात दुर्गम्मादेवीची रविवारी यात्रा होते. मुंबई, पुणे शहरात स्थायिक झालेली मुले आणि लेक-जावई या यात्रेत सहभागी होतायत. सकाळी रेवणसिद्धेश्वर मंदिर येथून विहिरीतून पाणी शेंदून आणणार आणून ते दुर्गम्मादेवीच्या पायावर वाहणार आहेत. जवळपास तीन हजार घरांतून नैवेद्य अर्पण केला जातो.
– दीपक मस्के , बेडर समाजाचे ट्रस्ट अध्यक्ष
आषाढ महोत्सवासाठी ट्रस्टी घेतेय परिश्रम
बेडर समाजाचे ट्रस्ट अध्यक्ष :- दीपक मस्के, धनंजय झंपले, खाजप्पा मिनगुले, अजित गुजले, विनोद माने यांचे शिष्ठमंडळ परिश्रम घेत आहे.
देवस्थान ट्रस्ट मंडळ
देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दुर्गप्पा झंपले, अमोल भोसले, उपाध्यक्ष विलास झंपले, मरगू मस्के, राजेश झंपले, जयेंद्र झंपले, अभिषेक झंपले, राजू मिनगुले, अनिल मस्के, आकाश मिनगुले, संतोश कुर्ले, नितीन कुर्ले, जगदीश कुर्ले,