९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेसची मशाल रॅली..

मशाल रॅलीतून स्वातंत्र्याच्या आठवणींना दिला उजाळा…

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि ८ ऑगस्ट – स्वातंत्र्यसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना अभिवादन करत , चले जाव चळवळची युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला रात्री ११.०० वाजता  वाजता पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून काँग्रेस कमिटीच्या वतीने मशाल रॅलीचा आरंभ करण्यात आला. यावेळी सोलापूर शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत बलिदान चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

              दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ९ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटीशांनी भारत सोडून जावे यासाठी भारत छोडो चा ठराव पास केला. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रोजी “चले जाव” व “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला होता. यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध जनतेत रोष पसरून आंदोलनाचा जोर पकडला. अनेक क्रांतिकारक, स्वातंत्रसैनिक यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन ब्रिटीशांना हद्दपार केले.

             या ऑगस्ट क्रांती मशाल रॅलीत कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे,अनंत म्हेत्रे,सरफराज काझी,प्रविण जाधव, श्रीकांत वाडेकर, विवेक कन्ना, शशिकांत शेळके, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, अनंत म्हेत्रे, मनोहर चकोलेकर, दिनेश डोंगरे, आशुतोष वाले,आदित्य म्हमाणे, संदेश कांबळे, सुभाष वाघमारे, तिरुपती परकीपंडला, अभिलाषा अचुगटला, गणेश नागशेट्टी,चंद्रकांत नाईक,नूरअहमद नालवार,अजय जाधव, कृष्णा नाईक, राजेश शेख,पृथ्वीराज नरोटे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *